Amazon Best Deals

Tuesday, September 29, 2020

ONLINE PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR- 3 AT DISTRICT PALGHAR पालघर येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

COMMISSIONERATE OF SKILL DEVELOPMENT, EMPLOYMENT AND ENTREPRENEURSHIP

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Job Fair in Maharashtra- 

Maharashtra Rojgar Melava 

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पालघर
यांच्या संयुक्त विद्यमाने  

बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पालघर दि. 29 : पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कामगार आपल्या राज्यात परत स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समिती पालघर जिल्हा यांच्या सुचनेनुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने  नोकरीइच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यातील नामांकित आस्थापना/ कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.

नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आपली आधार लिंक नाव नोंदणी करावी, त्यामध्ये अद्यावत मोबाईल नं., ई-मेल व शैक्षणिक पात्रता तसेच अनुभवाची नोंद करावी व ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली असेल त्यांनी वरील गोष्टी अद्यावत कराव्यात, जेणेकरून जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांवरील रिक्त असलेल्या जागांवर नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते.

या ऑनलाईन मेळाव्यांतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध उद्योजकाकडील सर्वसाधारणपणे ITI  या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच उमेदवारांसाठी एकूण 500  पेक्षा अधिक  रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबासाईटवर नोंदवीलेल्या रेजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड ने लॉगीन करावे व पंडित दिनदयाल उपादध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करुन पालघर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला अप्लाई करावे या पदधतीने सहभाग घ्यावा.  


सदर मेळाव्यामध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त कंपनींचा पर्याय निवडू शकतो. ऑनलाईन सहभागी असलेल्या कंपनीला वरील पध्दतीने पसंतीक्रमानुसार Apply केलेल्या उमेदवारांना उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट व्दारे किंवा ई-मेल व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.


तरी इच्छुक युवक व युवतींनी दिनांक : 30 सप्टेंबर 2020 ते 03 ऑक्टोबर 2020 पर्यंत अप्लाय (Apply) करावे. तसेच स्वत:बद्दलची माहिती संबंधित वेब पोर्टलवर अद्ययावत करताना काही अडचण उद्भल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 7058435714 किंवा या कार्यालयाचे ई-मेल- palgharrojgar@gmail.com वर संपर्क साधावा आणि या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त, पालघर यांनी केले आहे.

Vacancy Listing :

ITI Turner, Fitter, Welder come Fitter, Helper, Electrical, Refrigeration, Mechanical, Item Machinist, Microbiology, B.Sc Chemistry, QC Microbiologist Officer, CNC Operator,Chemist, Pharmacist  B. Com B.Pharm, M.Pharm, B.Sc Chemistry, M.Sc, Diploma/Degree in Mechanical 


(Employment ->Job seeker -> job seeker login with  Registration no. & Password -> Pandit Dindayal Upadhyay Job Fair -> District Palghar-> (View Job Fair Details) Vacancy Listing  (View Company Vacancies) -> Click on I Agree ->Apply for Suitable Vacancies)

View Company Vacancies :
VIRAJ PROFILES LTD.
MUKAT TANK AND VESELS PVT LTD

EMAMI LIMITEDKORTEN PHARMACEUTICALS PVT LTD

ANAND ARC LTDBEBITZ FLANGES WORKS PRIVATE LIMITED

BOMBAY RAYON FASHIONS LTD

KARAMTARA ENGINEERING PVT LTD


Join the 100,000+ businesses already growing with us Take the next step forward and join the thousands of businesses growing by engaging audiences online everywhere. Palghar Bharti 2020 Current and Upcoming Jobs Updates in Palghar. We updates here Government Jobs, School Jobs, Banking Jobs, University Jobs, Company Jobs which are all from Palghar. Subscribe our site regularly to grab Latest jobs in Maharashtra and all over India.




1 comment: